सावंतवाडी : मळेवाड राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
मळेवाड राणेवाडी येथील वस्तीत जाणाऱ्या रस्ताचे काँक्रीटकरण करण्याचे काम ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून मंजूर करण्यात आले आहे.या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे उपस्थित होते.मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना या राणेवाडीतील इतर विकास कामांसाठी जे ग्रामपंचायतकडून प्रयत्न सुरू आहेत त्यालाही यश मिळो.त्याचबरोबर गावाचा व वाडीच्या विकास करण्यासाठी आम्हाला शक्ती व प्रेरणा दे अशी श्री देव ब्राह्मण देव व राष्ट्रीय चरणी प्रार्थना केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, शांताराम राणे, आपा राणे, नामदेव राणे, अशोक राणे, बाळा राणे, सन्या राणे, सदानंद परब, पप्पू राणे, प्रकाश नाईक, बाळू नाईक, ठेकेदार शुभम वैद्य आधी उपस्थित होते.





