बीड : बीडच्या लिंबागणेश गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर धाडसी दरोडा टाकून बँक लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बँकेच्या पाठीमागच्या बाजूने शिडी लावुन दुसऱ्या मजल्यावरील खिडकी गॅस कटर च्या साह्याने तोडून चोरट्याने बँकेत मध्ये प्रवेश करत बँकच्या लॉकर मधील रोख रक्कम आणि दागिने चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली असून बँकेवर दरोडा टाकल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.पोलीस तपास सध्या सुरू आहे .





