सावंतवाडी : ग्रामपंचायत मळगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष निलेश कुडव यांच्या अध्यक्षतेखाली जाधववाडी येथील रस्त्याचा गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिढा सोडविण्यात तंटामुक्ती समितीला यश आले आहे. मळगाव जाधववाडी येथील परिसरात गैरसमजातून रस्ता बंद करण्यात आला होता. परंतु अध्यक्ष निलेश कुडव आणि तंटामुक्ती समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक विषय हाताळून रस्ता खुला करून दिला.
यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, पोलीस पाटील रोशनी जाधव, तंटामुक्ती समिती सदस्य विश्वनाथ गोसावी, गजानन सातार्डेकर, विनायक राऊळ, प्रकाश जाधव, बाळा जाधव, रघुनाथ जाधव, राजन जाधव, दीपक जाधव, सुचिता जाधव, विष्णू मळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानले.





