सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून सौ प्रविणा प्रशांत आपटे व कु .स्नेहा वसंत शिरसाट या दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023-24 देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती मधून प्रत्येक गावातील दोन महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023-24 देऊन सन्मानित करण्याचे ठरविण्यात आले होते.त्यालाच अनुसरून सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून सामाजिक सांस्कृतिक आरोग्य व महिला सक्षमीकरण तसेच इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सौ प्रविणा प्रशांत आपटे व कु . स्नेहा वसंत शिरसाट या दोन्ही महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023-24 देऊन सन्मानित करण्यात आले.सो आपटे यांना डॉक्टर गणपत टोपले तर स्नेहा शिरसाट हिला बँक ऑफ इंडिया मळेवाड शाखेचे शाखा व्यवस्थापक आर जे ओवाळ यांच्या सन्मानपत्र सन्मानचिन्ह व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
या सत्कार प्रसंगी सत्कारपर आपले मनोगत व्यक्त करत असताना सौ आपटे यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात मी महिला सक्षमीकरणासाठी नवनवीन उपक्रम राबवले होते.वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या संस्थांवर भरीव काम करण्याची संधी मला मिळाली.आज या सत्कारामुळे मी केलेल्या कामाची पोच पावती देण्याचे काम ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून करण्यात आले.त्याबद्दल मी समाधान व्यक्त करत आहे.तसेच गावातील महिलांनी गावाच्या विकासासाठी त्याच बरोबर महिला सक्षमीकरणासाठी भरीव कामगिरी करावी असे आवाहन आपटे यांनी केले.
तसेच स्नेहा शिरसाट ने आपले मनोगत व्यक्त करत असताना गावातील मुलांना सांस्कृतिक क्षेत्रात आपले कलागुण सादर करता यावे. त्याचबरोबर गावातील महिलांसाठीही एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी मी प्रयत्न केलेहोतेआज माझा सत्कार करून मी केलेल्या कार्याचा ग्रामपंचायत कडून जो सन्मान करण्यात आला आहे त्याबद्दल मी ग्रामपंचायतची आभारी आहे असे मत व्यक्त केले.शाखा व्यवस्थापक ओवाळ यांनी आपले मत व्यक्त करत असताना बँकेकडूनमहिला सक्षमीकरणासाठीनेहमीच सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.तसेच बँकेमार्फत अपघाती विमा बाबत असलेल्या योजनांची माहिती दिली.या सत्कार प्रसंगी सरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक,तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,सरिता मसुरकर,गावातील अंगणवाडी, सेविका मदतनीस आदी उपस्थित होते.





