माणुसकीची भिक्षाफेरी उपक्रमातून कोकण कट्टाने घडविले माणुसकीचे दर्शन

57

देवगड : कोकण कट्टा सेवार्थ उपक्रमाची चळवळ विलेपार्ले मुंबई या संस्थेच्या वतीने माणुसकीची भिक्षाफेरी हा उपक्रम २०१८ पासून सलग ७ वर्षे कोकण कट्टा विलेपार्ले मुंबई या संस्थेच्या माध्यमातून व श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यां यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला जात आहे. असंख्य आश्रयदाते यांच्यामुळेच या उपक्रमाला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे.यावर्षीही माणुसकीची भिक्षाफेरी या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून व साहित्यरुपी देणगीतून मुंबई येथील साई आधार या संस्थेतील मुलांना 3000 किलो धान्य, शालेय दप्तर, शैक्षणिक साहित्य, टॉवेल, कपडे ,चॉकलेट व बिस्किट या मुलांना देण्यात येते. कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दादा गावडे सुजित कदम, दया मांडवकर, साई भगत, राजू चव्हाण, प्रभाकर खेडेकर, सुरेश रावराणे आदी मंडळी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहेत.