सावंतवाडी : आजवर अनेक दशावतार नाट्य मंडळांमध्ये काम करत असताना माझ्या अभिनयासाठी तसेच कलेसाठी माझे अनेक सत्कार झाले मात्र आज स्वत :चं दशावतार लोककला मंडळ सुरु करत असताना गावाच्यावतीने करण्यात आलेला या घरच्या सत्काराने मी भारावून गेलो आहे गावातील थोरमोठ्यांच्या या आर्शिर्वादामुळे तसेच शुभेच्छामुळे पुढील वाटचालीस मला नक्कीच अधिक बळ मिळेल, अशा शब्दांत दशावतार नितीन आसयेकर यांनी आभार व्यक्त केले.
दशावतार लोककलेत आपला आगळा वेगळा ठसा उमटवीत अभिनयकुमार म्हणून प्रसिद्ध झालेले मळगाव गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध दशावतार कलावंत नितीन आसयेकर यांनी श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ नावाने स्वत : ची नाटक कंपनी सुरु केल्याबद्दल मळगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ . निकिता राऊळ, सौ निकिता बुगडे, सौ अनुजा खडपकर, सुभद्रा राणे, माजी सरपंच नीलेश कुडव, भाजपा शक्तीकेंद्रप्रमुख निळकंठ बुगडे सुखदेव राऊळ हरिचंद्र आसयेकर विश्वनाथ गोसावी प्रकाश जाधव आदी उपस्थित होते .





