बांदा : शिवसेनेचे मीरा भाईंदर महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४ चे विभागप्रमुख भरत नारायण पंडीत (५५, मुळ रा. कास) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बांदा येथे निधन झाले. ते बाजारात आले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना उपचारासाठी प्रथम खासगी दवाखान्यात व नंतर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी त्यांना मृत घोषित केले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कास सरपंच प्रविण पंडीत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झालेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.





