मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार दोडामार्ग तालुक्यातील विकास कामाचे भूमिपूजन.!

83

दोडामार्ग : तालुक्यातील विविध विकासकामांची भूमिपूजने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या दिनांक ६ जून रोजी सकाळी


१० वाजता ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजने करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी दिली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले की, उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे व साटेली – भेडशी येथील क्रीडासंकुलाचेही भूमीपूजन उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले. ह्या दोन्ही विकास कामांचे भूमीपूजन उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९ :३० वाजता या दोन्ही विकासकामांच्या ठिकाणी पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा होणार आहे.

तरी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व तमाम कार्यकर्त्यांनी विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी केले आहे.