सावंतवाडी : मळेवाड भटवाडी (घोलीत) याठिकाणी काजूच्या बागेत एक वयोवृध्द इसमाचा म्रुतदेह रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला दिसून आला.यानंतर मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे याना फोन करुन सदर घटनेची माहिती दिली असता या बाबत मराठे यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.अद्याप पर्यंत त्यां व्यक्तींची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. अंगात पांढरा फूल हाताचा शर्ट व निळी हाफ पॅन्ट घातली आहे.





