कणकवली साईनगर येथे सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह | ओळख पटविण्याचे काम सुरू..!

216

कणकवली : शहरात साईनगर भागात एका अज्ञात ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्तीही गेले चार दिवस या परिसरात फिरताना काहींनी पाहिली होती. मात्र आज गुराख्यांना या ठिकाणी ही व्यक्ती मृत स्थितीत आढळल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात डीवायएसपी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, विनोद चव्हाण, मनोज गुरव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड, चारुदत्त साटम आदी उपस्थित होते. सदर व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.