शिवडाव हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम..!

215

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेचा SCC मार्च २०२३ चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून प्रशालेचे प्रविष्ट झालेले ३५ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यामध्ये कु. प्रथम उमेश विठ्ठल पेडणेकर ८७%, कु. तन्वी राजन गावकर८६.२०%, कु. अथर्व विश्वास म्हसकर ८६.८०% तर इतर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे शिवडाव सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष – मोहन पाताडे, तसेच शालेय समितीच्या अध्यक्षा. भाग्यरेखा दळवी, त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मसवेकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होत आहे.