विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात..!

सावंतवाडी : आजगाव मंडळ अधिकारी विनायक कोदे यांनी बांदा चेक पोस्ट येथे विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेत कारवाई केली. उपविभागिय अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी प्रीतम पोवार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पोलीस कर्मचारी गोसावी व मुणगेक, होमगार्ड सावंत उपस्तिथ होते. सदरचे वाहन जप्त करून तहसिल कार्यालयात जमा करणेची कार्यवाही करण्यात आलीय.