पडेल कॅन्टीन इथं अपघात | दुचाकीस्वार जागीच ठार

देवगड : पडेल कॅन्टीन तिठा येथे पेट्रोल पंपाजवळ होंडा अमेझकार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी स्वार वृषाल संतोष गुरव हा जागीच ठार झाला आहे. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला यातील होंडा अमेझ कार ही सांगली येथील कुटुंबीय गगनबावडा येथून विजयदुर्ग येथे फिरण्यासाठी येत होते तर 25 वर्षीय वृषाल गुरव हा पडेल कॅन्टीन येथून सौंदाळे येथे आपल्या गावी जात होता.

पडेल पेट्रोल पंप नजीक या दोन गाड्यामध्ये अपघात झाला. कारची दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार वृषाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला.
अपघातची माहिती मिळताच विजयदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघाताचा अधिक तपास विजयदुर्ग पोलीस निरीक्षक भारत कुमार फारणे करत आहेत.