देवगड इथं सशक्त नारी, समृध्द भारत शिबीराला चांगला प्रतिसाद…!

देवगड : आज बुलेट ट्रेन, मंगळावर जाणे ही स्वप्ने पहात असतो . परंतु काही समस्या तक्रारी असल्या , तर त्या कोठे मांडाव्यात व सोडवाव्यात याबद्दल माहिती नसते . महिलांच्या समस्या ,तक्रारी या एकाच छताखाली येतील व समस्या निवारण होतील , या करिता हा उपक्रम स्तुत्य असुन या उपक्रमातुन ज्या महसुल विभागाच्या समस्या अथवा तक्रारी असतील , त्या निश्चितच मार्गी लावल्या जातील असे प्रतिपादन देवगड तहसीलदार श्रीम.स्वाती देसाई यांनी केले.देवगड इंद्रप्रस्थ हॉल येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या.

या शिबीराचे उद्घाटन महिला बाल विकास विभाग मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णा पाटील, मनोज पालांडे, व देवगड तहसिलदार श्रीम. स्वाती देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, बालविकास अधिकारी देवगड पाटील, विस्तार अधिकारी समिर होडावडेकर, कृषी अधिकारी कैलास ढेपे,पशुधन अधिकारी कैलास ढेपे, पशुधन अधिकारी डॉ .घोगरे , डॉ . ढेकणे , तालुका आरोग्य अधिकारी श्री . रवींद्र राठोड , आर्थिक मविआ लेखाधिकारी श्रीमती जेमने, उष:कला केळुस्कर , अन्नपुर्णा लोकसंचलित साधन केंद्र देवगड व्यवस्थापक श्रीम . अस्मिता जाधव , मुख्यसेविका श्रीम . राखी राणे , मुख्य सेविका श्रीम पुजा सावंत , मुख्य सेविका सुवर्णा भगत, कमलेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी या शिबिरात उपस्थित महिलाना कृषी योजनांची माहीती दिली .यावेळी बॅक ऑफ इंडिया शाखा देवगड शाखाधिकारी श्री .बंबानी यांच्या उपस्थितीत ५ महिला बचत गट यांना कर्जवितरण चेक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . सकाळच्या सत्रात गटविकास अधिकारी श्रीम. करिश्मा नायर IAS यांनी विभागांना भेटी देत पाहणी केली.

या शिबीरात १०१७ महिलांनी सहभाग घेतला होता तसेच २६५३ तक्रारी अर्ज प्राप्त झालेले असुन २०७ तक्रार अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्यात आलेली असुन एकुण प्रचार प्रसिद्धी व तक्रारीच निवारण करण्यासाठी २० विभाग कार्यरत होते. या शिबीरात सुत्रसंचालन गटशिक्षण अधिकारी श्री. प्रजापती थोरात , विनायक धुरी ,प्रस्तावणा व आभार बालविकास अधिकारी देवगड श्री . अमोल पाटील यांनी केल.