बांदेकर फाईन आर्ट कॉलेजमध्ये एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स सुरू…!

83

सावंतवाडी : येथील बी.एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजच्या माध्यमातून यावर्षी पासून एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स सुरू करण्यात आला आहे. कलेची आवड असलेल्यांना तसेच भविष्यात कलेत करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोर्स मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या संचालिका अनुराधा बांदेकर व अन्य पदाधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान दहावी किंवा बारावी नंतर या कोर्ससाठी विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतीही सीईटी परीक्षा देण्याची अट नाही. फक्त वीस हजार इतकी फी घेण्यात येणार असून त्या फी मधून वर्षभर साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडुन आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करुन या कोर्सची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक अनुराधा बांदेकर, केदार बांदेकर, प्राचार्य तुकाराम मोरजकर, शिक्षक सिध्देश मोरजरक, कला शिक्षक रुपेश नेवगी, बाळाराम सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी सौ.बांदेकर यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, गेली अनेक वर्षे बांदेकर महाविद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार कला प्रशिक्षण दिले जात आहे. या कोर्सच्या माध्यमातून जास्तीत-जास्त मुलांना संधी मिळावी यासाठी हा नवा कोर्स संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४०५८३०२८८, ९४२०२६०९०३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे