सावंतवाडी : बनावट दागिने देऊन शहरातील एका बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात राजारामपुरी-कोल्हापूर येथील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काल एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे. ॠतेश सुरेश माजिक (वय २६), असे त्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार सागर नलावडे हा अद्याप पसार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.





