कणकवली पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई | गाड्यांसह मुद्देमाल केला जप्त…!

344

कणकवली : तालुक्यातील नागवे येथील माळावर चाललेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक धाड टाकण्यात आली. यावेळी माळरानावर चाललेला जुगार अड्डा आणि त्यातील काही व्यक्ती तसेच तिथे असलेला गाड्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कणकवली तालुक्यातील अचानक अशी मोठी कारवाई म्हटली जाते. सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दुसरी कारवाई असून कणकवली तालुक्यात राजरोसपणे जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. साधारणपणे या कारवाईत दोन दुचाकी आणि दोन चार चाकी ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते तर काही व्यक्ती पळून गेल्याची माहिती समोर येतेय. परंतु त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

हे सर्व खेळी कणकवली, मालवण, सावंतवाडी, कुडाळ येथील होते. येथील अंधाराचा फायदा घेत काही जण आपली वाहने तेथेच टाकून पसार झाले. या कारवाईत जयवंत आत्माराम बाईत, वय ४९ वर्षे, रा. कणकवली तेलीआळी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, सिध्देश भास्कर ठाकुर, वय ३९ वर्षे, रा. कलमठ लांजेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, संतोष बाळकृष्ण कुडतरकर, वय ५० वर्षे, रा. माणगाव बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, विशाल वासुदेव सावंत, वय ४५ वर्षे, रा. सावंतवाडी वैश्यवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, केतन रावजी ढोलम, वय ३५ वर्षे, रा. कोळ आडारीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, मुळ रा. मुंबई, महेश गंगाधर जोगी, वय ३२ वर्षे, रा. मालवण बाजारपेठ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, कुलराज भगवान बांदेकर, वय २२ वर्षे, रा. मालवण जोशीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, शुभम कृष्णकांत मिठबावकर, वय २२ वर्षे, रा. मालवण हडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, रोहन जितेंद्र वाळके, वय २९ वर्षे, रा. मालवण देऊळवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, हेमराज प्रकाश सावजी, वय ३० वर्षे, रा. वायरी भुतनाथ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, विनायक शिर्के कलमठ कणकवली, सहील आचरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.