अँड दत्तात्रय सातवळेकर यांची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठावर न्यायिक प्रबंधक पदावर नियुक्ती…!

258

देवगड : देवगड तालुक्यातील म्हणजे गावचे सुपुत्र अँड दत्तात्रय सातवळेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांमध्ये न्यायिक प्रबंधक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायिक सहसंचालक म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अँड सातवळेकर यांनी देवगड मधील न्यायालयात वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केले. त्यानंतर मुंबई सांगली लातूर या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे . आता त्यांची न्यायिक प्रबंधक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.