सावंतवाडी : आज सकाळी 11:30 च्या सुमारास माडखोल धवडकी या रस्त्यावर इनोव्हाकार व टू व्हीलरमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात घडला.
या अपघातामध्ये पशुवैद्यकीय परिचर डॉ. अनंत परब यांना डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. इनोव्हाकार चालक हा मुंबईतील असून त्याचे नाव फौजदार शेख आहे.
अपघात झाल्यानंतर पेशंटला तिथेच टाकून सदर व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. परंतु पोलीस स्टेशनच्या जरा पुढेच त्यांना पोलिसांनी अडवलं व पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले.
त्यानंतर पेशंटला माडखोल वरून स्वप्निल सावंत या सामाजिक कार्यकर्त्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची खबर मिळताच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर व रवी जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन सदर पेशंटला सर्वपरी मदत करून सुखरूप घरी सोडले. पेशंटची तब्येत आता ठीक आहे. पेशंटच्या पत्नीने व पेशंटने सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.





