सिंधुदुर्गनगरी :
कोकण रेल्वे प्रवाशांना विशेष सूचना
गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या बुकिंग संदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायकजी राऊत साहेब हे गुरुवार दि.२५ मे २०२३ रोजी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.संजयजी गुप्ता यांची भेट घेणार आहेत. तरी ज्या प्रवाशांकडे अधिकची माहिती असेल, त्यांनी कृपया vinayakbraut@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावी, ही विनंती असे आवाहन खासदार विनायक राऊत यांच्या तर्फे करण्यात आले आहे .





