डॉ. आठवलेंच्या जन्मोत्सवानिमित्त सनातनकडून सावंतवाडीत दिंडी…!

सावंतवाडी : सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.  जयंत आठवले यांच्या ८१ व्या  जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात “हिंदूराष्ट्र-जागृती अभियान” राबवले जात आहे.  या अभियानाचा एक भाग म्हणून तसेच हिंदू मधील ब्रह्मतेज वाढवून त्यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत करण्यासाठी सावंतवाडी शहरात सायंकाळी ३:३० वाजता भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. या ‘हिंदू एकता दिंडी’ मध्ये ४००हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. दिंडीच्या आरंभी सनातन संस्थेचे श्री उमाजी चव्हाण यांनी शंखनाद केला.

यावेळी गवळी तिठा  येथे धर्मध्वजाचे  पूजन बांदा डेगवे   येथील धर्माभिमानी  श्री जयवंत देसाई  यांनी केले.  यावेळी पुरोहित्य श्री, जनार्धन भागवत  यांनी केले. त्यानंतर धर्माभिमानी  डॉ. नितीन म्हाळवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीला प्रारंभ झाला. सनातन संस्थेचे  धर्मप्रचारक संत सद्गुरू सत्यवान कदम हस्ते धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण  करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कु. दिव्या शिंत्रे हिने केले.  या हिंदू एकता दिंडीला येथील गवळी तिठा  येथून प्रारंभ झाला. पुढे  बस स्थानक, श्रीराम वाचन मंदिर गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्री हायस्कूल ते पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी नगरपरिषद, श्रीदेव नारायण,  मंदिर, या मार्गाने जाऊन येथील बस स्थानकाजवळ दिंडीची सांगता झाली.