उद्धव ठाकरे म्हणजे छु मंतर आणि जादूटोणा वाले : नितेश राणे

Maharashtra, March 15 (ANI): BJP Leader Nitesh Narayan Rane addresses a press conference at Party Office in Mumbai on Monday. (ANI Photo)

कणकवली : पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान जेम्स मारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले म्हणून त्यांच्यावर टीका करण्या इतकी लायकी उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांची नाही. तेवढी त्यांची उंची सुद्धा नाही. त्या देशात जादूटोणा चालतो असे म्हणणाऱ्या खासदार राऊत यांचा मालक उद्धव ठाकरे सर्वात जास्त जादूटोणा आणि छू मंतर करणारा आहे. काळी विद्या करून त्यांनी काय काय मिळवले आहे ? अशा शंभर गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्याच्या मागील बाजूस जेसीबीने खड्डा खोदून त्यात किती लिंबू आणि किती गोष्टी ठेवलेल्या आहेत याची मी जंत्री देऊ शकतो. कर्जतच्या फार्म हाऊस वर किती नर बळी दिले याची माहिती देऊ शकतो. काही दिवसा पूर्वी एका बाबा-बुवा कडे जाऊन ठाकरे यांनी सपत्नीक दर्शन घेतले तेव्हा बुवाने उद्धव ठाकरे यांना तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असे सांगितले.मात्र पत्नी मुख्यमंत्री होवू शकतात असे सांगितले तेव्हा राज्यातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याची घोषणा करण्यात आली होती. सौ. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची ईछा होती.हे सर्व प्रकार जादूटोण्याचेच आहेत असा घणाघात भाजपचे नेते आमदार नितेश राणे पत्रकारांशी बोलताना केला.

कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी माध्यमांची आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले,राष्ट्रवादीला जास्त जागा द्यायच्या. दोन नंबरच्या जागा ठाकरे सिनेमा द्यायच्या. असे उबाठा आणि राष्ट्रवादी दोन पक्षात ठरले आहे.त्याची एक बैठक गुप्त झाली आहे.काँग्रेसला फक्त पाच जागा द्यायचे असे यात ठरले आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ यांना महाविकास आघाडीत फारसे स्थान नाही आणि काँग्रेसमध्ये सुद्धा कर्नाटक मधील डीके शिवकुमार सारखीच अवस्था नानाभाऊंची होणार आहे. कल्याण डोंबिवली येथील उमेदवारी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना मिळावी म्हणून परांजपे हे स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटलेला आहे याचाच अर्थ काँग्रेसचा कार्यक्रम केला जाणार आहे. हे नाना पटोले यांनी ओळखावे. शकुनी मामा संजय राऊत यांची वक्तव्य ही त्याच दृष्टीने असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

संजय राऊत हे राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांचा सातत्याने अपमान करतात त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे आता तर संजय राऊत यांनी अजित दादांचा डीएनए तपासण्याची गरज असल्याचे म्हटले आहे माझं तर म्हणणं आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांचाही डीएनए तपासला गेला पाहिजे त्यांचे रक्त भगवे आहे की हिरव्या आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे त्यामुळे संजय राऊत यांनी अजितदादांवर टीका करून त्यांचा कमीपणा करण्यापेक्षा आणि भांडणे लावण्यापेक्षा स्वतःची हिंदुत्ववादाची भूमिका कशी बदलली हे जाहीर करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगभरात सन्मान होतोय हे विरोधकांना पहावत नाही पाकिस्तानच्या प्रेमात असलेले संजय राऊत आणि त्यांची सेना यांना पंतप्रधान मोदी यांना मिळत असलेला मानसन्मान पचनी पडत नाही आणि म्हणूनच ते अशी वक्तव्य करतात.
खासदार सुप्रिया सुळे यांचा समाचार घेताना आमदार नितेश राणे यांनी सर्वधर्मसमभाव सुप्रिया ताईंना कोणत्या पद्धतीचा अपेक्षित आहे या ठिकाणच्या हिंदू महिला आणि हिंदू धर्मच त्यांना मान्य नाही. त्यांचा सर्व धर्म समभाव फक्त मुस्लिम समाजापुरताच आहे. अशी टीका केली.