वळीवंडे इथं मोठा अपघात | कार झाली पलटी

देवगड : देवगड नांदगाव मार्गावरील वळीवंडे तोरसोळे फाटा येथे टाटा इंट्रा टेम्पोची महिंद्रा एक्सयुव्ही ५०० चारचाकीची जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात महिंद्रा एक्सयुव्ही ५०० ही गाडी पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले, तर टेम्पोच्या ड्रायव्हर साईटच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने टेम्पो चालक बचावला तर दुसऱ्या एक्सयुव्ही गाडी मधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी सुमारे चार ते साडेचारच्या सुमारास घडला.

अपघात स्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कुडाळ येथील मंगेश सुधाकर वाडयेकर ३२ हे आपल्या ताब्यातील एमएच ०७ एजे २६९८ या टाटा इंस्टा या टेम्पोने भरधाव वेगाने कुडाळच्या दिशेने जात होते. देवगड नांदगाव वरून कुडाळच्या दिशेने जात असताना तोरसोळा फाटा येथे वैभववाडीहून देवगडच्या दिशेने येणाऱ्या एक्सयुव्ही ५०० (w१०) या गाडीला टेम्पोची जोरदार धडक बसली.

ही धडक एवढी जोरात बसली की वैभववाडी हून देवगडच्या दिशेने जाणाऱ्या या कारचे तोंड पुन्हा वैभववाडीच्या दिशेने होत कार पलटी झाली.या अपघातात टेम्पो चालक विशाल दशरथ मोरे ३२ मांगवली वैभववाडी यांच्यासह ४ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. कारमध्ये एकूण ९ प्रवासी होते.या अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात कारमधील कारचालक विशाल दशरथ मोरे वय ३२, दिपाली दशरथ मोरे ४९ प्रियंका दशरथ मोरे २८ अनिरुद्ध मोरे २७ राहणार रा मांगवली, वैभववाडी , संगीता संजय दळवी वय ४५ राहणार कुडाळ हे सर्व वैभववाडी होऊन आपल्या नातेवाईक यांना देवगड येथे भेटण्यात जात होते. या अपघाताची खबर तोरसुळे पोलीस पाटील संजय वळंजू यांनी देवगड पोलीस स्टेशनमध्ये दिली असून अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमित हळदणकर,एस पी कदम, श्री महाडिक यांनी अपघात स्थळीधाव घेत अपघाताचा पंचनामा करून रस्त्यामधील दोन्ही अपघातग्रस्त वहाने बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. या अपघाताची नोंद दाखल करण्याची प्रक्रिया देवगड पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती.