मुंबई : महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार होतं. एका कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती सरकार चालवला, आम्ही तीन भिन्न पक्षाचे लोक एकत्र आलो. आणि सरकार चालवले तेव्हा त्याच्यामध्ये उत्तम संबंध होता. ज्या पद्धतीने सरकार चालवलं तोच समन्वय तोच एकोपा हा विरोधी पक्षांमध्ये काम करताना सुद्धा असायला हवा तरच आपण पुढल्या सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो ही भूमिका आमच्या सगळ्यांची म्हणजे शिवसेनेची आहे.
विधान परिषद निवडणुकीमध्ये जे घडले ते नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षाच्या संदर्भातील घटना घडली असली तरी पण तू महाविकास आघाडी म्हणूनच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे याचं कारण असं आहे की या पाच जागांच्या निवडणुका संदर्भात ज्या पद्धतीने एकत्रित बसून भूमिका ठरवण्यास चर्चा करणे व्हायला हवं तर ते दिसत नाही. मी कोणाला दोष देत नाही
नागपूर अमरावतीची या दोन्ही जागा संदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार नव्हता आणि त्यांनी आमचा उमेदवार घेतला .आम्ही मागत होतो आमचे बुलढाण्याचे उमेदवार इगाडे यांनी तयारी केली होती.तुम्ही त्यांनाच उमेदवारी दिली म्हणजे तुमच्याकडे उमेदवार नव्हता .त्याठिकाणी आम्ही लढलो असतो तर आणि जोरादलढलो असतो.
नाशिकचा जो घोळ झाला त्यासंदर्भात कोणाला दोष देता येणार नाही. अशा प्रकारचा उलट्या-पालत्या सगळ्याच पक्षात होत असतात . तांबे कुटुंब जे आहे परंपरागत काँग्रेसचे निष्ठावान कुटुंब आहे. कसा काय कोणी दाखवायचा की उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत का त्यांच्या डोक्यात काय चाललंय किंवा भारतीय जनता पक्षाने काही गुप्तपणे कारवाई केल्यात हे प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्या पक्षाला आम्ही दोष देणार नाही . आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरे गेलेलो आहोत अशा प्रकारच्या भविष्यामध्ये आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाही .जसे प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची चर्चा सुरू आहे.पण ती लपवून न राहिली.त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना माहिती देत असतो काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही माहिती देत असतो त्यातून जो काही निकाल लागायचा तो भविष्यात लागेल पण कोणतीही गोष्ट घेताना महत्त्वाचा हा समन्वयाची भूमिका असणार गरजेची आहे.





