नागपूर : भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून तोतया पी. ए. ने राज्यातील काही आमदारांना फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे. नागपुरातील भाजपच्या 2 आमदारांनाही राज्य किंवा केंद्रीय मंत्रिपद देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केली.
मात्र, नागपुरातील भाजप आमदार विकास कुंभारे यांचा सतर्कतेमुळे आरोपी जाळ्यात सापडला आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली असून नागपूर पोलिसांनी आरोपीला गुजरात मधून आज अटक केली आहे. नागपूर पोलीस आरोपीला घेउन सायंकाळ पर्यंत नागपूरात पोहचणार असून त्यानंतर आरोपीची सखोल चौकशी केली जाणार आहे. नीरज राठोड असे तोतया स्वीय सहायकाचे नाव असून तो गुजरात येथील राहणारा आहे. आरोपीने राज्यातील काही आमदारांना भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे पी ए सांगून मंत्रिपदाचे आमिष दाखवीत कोट्यवधी रुपयांची मागणी फोनवरून केली होती . त्यात कोणी आमदार बळी पडले का याची चौकशी सुदधा चौकशी पोलीस करत आहेत.





