कणकवली : असलदे गांवठण ग्रामविकास मंडळ, असलदे गांवठण ग्रामविकास मंडळ (मुंबई) आयोजित श्री.सत्यनारायण महापूजा शनिवार दि. १३ मे सकाळी ९ वाजता सत्यधाम सभागृह असलदे गांवठण येथे आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ मे ला सकाळी ९ ते १२.३० रक्तदान शिबीर ,महाप्रसाद दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत,रात्री : १० वा लहान मुलांचे रेकॉड डान्स तरी आपण सह कुटुंब सह परिवार उपस्थित राहुन तिर्थ प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असं आवाहन असलदे गांवठण ग्रामविकास मंडळ, असलदे गांवठण ग्रामविकास मंडळ (मुंबई) वतीने करण्यात आले आहे.





