सावंतवाडी : रंगभूमी,कविता, वैचारीक आणि चित्रपट क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाश झोतात आलेले कोकणचे सुपुत्र कवी लेखक दिग्दर्शक डॉ.अनिल सरमळकर यांच्याशी महाराष्ट्र माझा उपसंपादक हेमंत मराठे यांनी संवाद साधला असता त्यांनी दिलेली उत्तर
प्रश्न : तुमचे लेखन दिग्दर्शन व निर्मिती असलेला ‘ काहूर ‘ चित्रपट दिर्घ काळ रखडला आहे त्याबद्दल सांगा व हा चित्रपट कधीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ?
उत्तर – हो अनेक अडचणी आल्या काहूर या चित्रपटाची प्रक्रीया पुर्ण करताना, अनेक अडथळे अनेक संकटे सुध्दा आली. सुमारे चार वर्षे ही प्रक्रीया सुरु होती. चित्रपट पुर्ण होत असताना मधल्या काळात कोविडचे संकट आले.
आर्थिक अडचणींमुळे अनेकदा पदरी निराशा येत होती. नैराश्य येत होते तरीही चित्रपट पुर्ण करण्यासाठी मी कंबर कसली
कर्जाचा भार सहन केला परंतु तरीही पुन्हा तांत्रिक अडचणी येतच होत्या तर पोस्ट प्रोडक्शन साठी पैसेच नव्हते तर कधी पैसे हाती आले तर संबंधीत तंत्रज्ञ
आठ आठ महीने आउट ओफ सिटी असायचे..अशा वेळी काय करावे हे काही सुचत नसायचे… मात्र अशा सुरुवातीपासुनच आलेल्या असंख्य अडचणीं दुर करत करत आणि प्रचंड उशीर होवूनही आता काहूर चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन पूर्ण झाले असुन चित्रपट आधी फिल्म फेस्टिवल्स मधे प्रदर्शित होइल व येत्या ऑगस्ट मधे संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यासाठी मी व माझी संबंधीत टिम आटोकाट प्रयत्न करत आहोत.
प्रश्न : काहूर चित्रपटाबद्दल सांगा.. काय आहे कथा आणि त्याचे वेगळेपण काय सांगाल ?
उत्तर — काहूर चित्रपटाची कथा ही एक आपल्याच भोवतालात असणारी एक भळाभळती सामाजिक जखम आहे,अत्यंत संवेदनशील अशा पौगंडावस्थेतील ( टीन एजर ) मुलांच्या निरागस नितळ मनोविश्वाचे व्याकूळ करणारे चित्रण हा चित्रपट आपल्याला दाखवतो. निरागस वय आणि अशा मनावर आघात झाल्यावर निर्माण होणाऱ्या तीव्र वेदनेचे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अकल्पित अशा गंभीर थराराची ही रहस्यकथा आहे त्याचबरोबर ही एक अत्यंत संवेदनशील अशी सामाजिक कथा आहे. ज्या समाजात विषमतेचे विष अत्यंत विकृतपणे पसरलेले आहे…आणि
हीच विकृती कसा भयानकपणे विळखा घालते समाजमनाला त्याचे दाहक विदारक थरारक आणि रहस्यमय सत्य या कथेत समोर येते ..
समाजातील प्रत्येकाने प्रत्येक कुटुंब प्रत्येक पालकांनी प्रत्येक शिक्षकाने ही कथा पहायला हवी आहे.
या चित्रपटाची कथा ही एका विशिष्ट अशा वर्गाची समाजाची नसुन ती एका निरागस विश्वाची अशी ही गंभीर रहस्यकथा प्रत्येक कुटुंबाची आहे म्हणुनच ती वैश्विक कथा आहे ..
समाजातील प्रत्येक जबाबदार घटकाने ही कथा हा चित्रपट पाहायला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते आणि म्हणुनच मी या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक व सह- निर्माता म्हणुन विनम्रपणे प्रेक्षकांना विनंती करत आहे
प्रश्न : भारतीयच नव्हे तर जागतिक रंगभूमीवर तुमची दखल घेतली जात आहे तसेच तुमचे वैचारीक लेखनही आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धीमंत वर्तुळात चर्चीले जात आहे.. कसं पाहता तुम्ही याकडे ?
उत्तर -हो. माझ्या The fox या नाटकाची दखल जागतिक रंगभूमीने,अमेरिकन ब्रॉडवे तसेच ब्रिटिश रंगभूमीने दखल घेतली
आणि The fox ला प्रचंड यश मिळत आहे ते त्या नाटकाच्या वेगळेपणामुळे व त्यातील जागतिक साहित्याचे संदर्भ व जागतिक साहित्यातील त्याचे महत्व ओळखुन.. अर्थातच मला हे यश अनपेक्षित असतांना येउन अचानक आदळल्यासारखे आहे त्याचा आनंद आहेच तसेच आता The fox ची मी त्रिनाट्यधाराही लिहिली आहे त्यामधील
‘ Its already tomorrow ‘ व ‘ Vulture Whispers ‘ ही दोन्हीही नाटके जागतिक पातळीवरील नाट्यकर्मी अभिनेते दिग्दर्शक आणि प्रतिष्ठित अमेरिकन विद्यापीठांत पोहचली असुन त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे तसेच माझे वैचारीक लेखनही वाचले जात असुन त्याची दखल युरोपीय बुद्धीवंत वर्तुळात घेतली जात आहे त्यामुळे माझी लेखक नाटककार म्हणुन जबाबदारी अधीक वाढली आहे.
प्रश्न : काहूर या कोकणातील तुमच्या पहिल्या मराठी चित्रपटानंतर तुम्ही आगामी नियोजित अती महत्वाकांक्षी बिग बजेट ‘ सनी बॅंकर ‘ या महाचित्रपट प्रकल्पाद्वारे थेट आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस करत आहात.. तुम्ही एका दुर्गम खेड्यातील एका अत्यंत सामान्य कुटुंबातुन आला आहात.. कसे शक्य आहे हे धाडस तुम्हाला ? काय सांगाल ?
उत्तर -खरोखरच हा अती महत्वाकांक्षी स्वप्नवत महाप्रकल्प आहे तसाच तो तेवढाच अत्यंत आव्हानात्मकही आहे. एपिक फिल्म म्हणावे तसा हा प्रचंड आवाक्याचा प्रकल्प आहे.
केवळ एक प्रयत्न किवा संकल्पना म्हणुन मी ही कथा कागदावर उतरवली होती.
प्रत्यक्षात ही कथा पडद्यावर येणं म्हणजे स्वप्न सत्यात यावे तसे आहे. फॅन्टसी आणि स्वप्नखेळ.. किमया आणि ब्लॅक सटायरचा हा प्रकार आहे आणि ही कथा म्हणजे साक्षात अद्भुतरम्य जग आहेच पण मॅजिक रिॲलिजम ची शैली असुन भयकारक वास्तवाचे चित्रण आणि त्यावर कठोर भाष्यही या कथेत करण्यात आले आहे.
बिग बजेट आणि देश परदेशातील कलाकार तंत्रज्ञ या महाकलाकृती च्या प्रक्रियेत सहभागी होणार असुन चित्रपटाचा दर्जा सर्व पातळ्यांवर आंतरराष्ट्रीय असणार आहे तसेच चित्रपट अनेक भाषांमधुन प्रदर्शित केला जाणार आहे तथापि या चित्रपटाची मुख्य भाषा हिंदी व इंग्रजी राहणार आहे.
इतक्या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी ‘ फिलिपाईन्स इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन्स ‘ सारखी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती संस्था माझ्या पाठीशी उभे राहिली याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.
प्रश्न : अजुन समांतरपणे तुमचे कोणते अन्य काम सुरु आहे ?
उत्तर –Its Already Tomorrow ‘ व Vulture Whispers ‘ ही दोन नाटके पुस्तकरूपाने लवकरच प्रकाशित होत असुन
गेली दोन दशके मी लिहिलेल्या इंग्रजी कवितांचा ‘ I feel Nothing ‘ हा इंग्रजी कवितासंग्रह या वर्षाच्या अखेरीस प्रकाशित होत आहे. त्याचप्रमाणे माझे वैचारीक लेखांचे पुस्तकही नियोजित आहे.
मात्र आगामी ‘ काहूर ‘ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सध्या मी पूर्णपणे त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
तुमचा इथवरचा हा खडतर प्रवास
काय वाटते तुम्हाला ?
उत्तर – सर खरोखरच हा माझा प्रवास मनाच्या शरीराच्या आणि बुद्धीच्या स्तरावर खुप खडतर होता..
सरमळे सारखा दुर्लक्षित अगदी खेडेगाव.. पराकोटीची निरक्षरता सामाजिक विषमता, भौतिक अभाव, सांस्कृतिक अभाव इत्यादिने समाज ग्रासला होता माझ्या लहानपणी… अर्थात गरिब शेतकरी दलित कुटुंबात माझा जन्म झालाय .. पण शिक्षणाची खुप आस होती आणि त्याचे महत्वही समजत होते प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत शिक्षण केले आणि विशेष म्हणजे मी इंग्रजी विषयात मनापासुन रमत होतो म्हणुन इंग्रजीवर जास्त लक्ष दिले पुढे इंग्रजी भाषेतुनच मी भारतीय व जागतिक साहित्य रंगभूमी संगीत कला तत्वज्ञान सिनेमा याचा व्यासंग करत आलोय आणि याचवेळी जागतिक कविता साहित्य याचे मला प्रचंड वेड लागले याच काळात मी इंग्रजी व मराठीतुन खुप कविता लेखन केले आहे.
व तत्वज्ञानाचा अभ्यास सुध्दा केला… याचवेळी सामाजिक परिवर्तन चळवळीतही कार्यरत होतो आणि एकाच वेळी मराठी व इंग्रजी भाषेतु लेखन करु लागलो होतो.
मात्र हा प्रवास हा काळ प्रचंड एकाकी पाडणारा अस्वस्थ करणारा घुसमट करणारा उपेक्षा अपमानाचा सामना करायला लावणारा होता तेवढाच खुप शिकविणारा होता ..
याच काळात मी माझे मह्त्त्वाचे कविता नाटक व वैचारीक लेखन केले आहे….
तेच लेखन आज जागतिक पातळीवर पोहचत आहे.





