पर्यटन महोत्सव 2023 निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

69

सावंतवाडी : मळेवाड येथे भव्य युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांनी आयोजित केलेल्या भव्य युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 निमित्त मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिराला संत समाज मळेवाड व तालुका पत्रकार संघ सावंतवाडी हे सहआयोजक होते.

या शिबिराचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे सरपंच सौ मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते व तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराटकर व संत समाज मळेवाडचे अध्यक्ष दाजी सावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मनोगत व्यक्त करत असताना मयूर चराटकर यांनी शिबिरात सावंतवाडी पत्रकार संघाला समाविष्ट करून घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.तसेच अशी शिबिरे गावोगावी होण गरजेचे असून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे मत व्यक्त केलेजे रक्तदाते रक्तदान करण्यासाठी आले होते त्यांचे विशेष आभारही त्यांनी मानले.तर या कार्यक्रमात उपसरपंच हेमंत मराठे यांनी रक्तदानचे महत्त्वविशद करत गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा रक्तगट तपासणीचे शिबिर ग्रामपंचायत कडून लवकरच राबवण्याचा मानस असल्याचे सांगितले.ज्यामुळे गावातील एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासल्यास रक्तदाता हा गावात मिळू शकतो असे सांगितले.सरपंच सौ मिलन पार्सेकर यांनी रक्तदात्यांचे आभार मानत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,मधुकर जाधव,वैद्यकीय अधिकारी अदिती ठाकूर,वैद्यकीय अधिकारी वैष्णवी जोशी,तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर,डॉ
पाटील,संत समाज मळेवाड अध्यक्ष दाजी सावळ,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर आदि उपस्थित होते.