लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताची जामिनावर मुक्तता…

115

सावंतवाडी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी ऑल्विन रुजाय पिंटो,रा. गरड,सावंतवाडी यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लगट करण्याचा प्रयत्न करुन तिच्यावर लैंगिक आत्याचार केल्याचा प्रकार सावंतवाडी येथील गरड परिसरात घडला होता. त्याप्रकरणी ऑल्विन रुजाय पिंटो,रा. गरड,सावंतवाडी याच्या विरुद्ध सावंतवाडी पोलिसठाण्यात भा.द.वी. कलम ३७६(३),३७६(२)(J),३२३,३५४,३५४A(१)(i),३५४A(१)(ii) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आधि.२०१२ कलम ४,६,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर आरोपी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली होती, आरोपी याचेतर्फे ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी जामिन अर्ज दाखल केलेला होता. त्याकामी ओरोस येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी ॲड. निरवडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी याचा जामिन अर्ज मंजूर केला असून. आरोपीयाची जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश पारीत केलेला आहे.