जय भोसले यांचा भेडशी ग्रामस्थांतर्फे सत्कार…!

86

बांदा : सिंजिक्रीकॉ. असो’च्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल जय भोसले यांचा भेडशी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट कॉमेंट्रेटर असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल भेडशी गावचे सुपुत्र जय भोसले यांचा नुकताच दामोदर कला क्रीडा मंडळ आणि भेडशी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.भेडशी येथील उद्योजक नंदू टोपले यांच्याहस्ते जय भोसले यांचा शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी उपसरपंच गणपत डांगी,ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र उर्फ संतोष भिसे,उद्योजक गोपाळ बुडके,उमाकांत टोपले,सर्वेश मणेरकर, प्रसिद्ध शासकीय ठेकेदार सिद्धेश पांगम,सागर मोरजकर,समीर मोरजकर,निलेश तळणकर,मधुकर जुवेकर, गोविंद शिरसाट,सुजय मणेरकर यांच्यासह ग्रामस्थ व खेळाडू उपस्थित होते.
राज्यातील पहिली वाहिली क्रिकेट समालोचकांची ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.जय भोसले यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या रकमेच्या २० लाख रुपये पारितोषिक असलेल्या उडुपी प्रीमियर लीग तसेच गोव्यातील ५ लाखांचे पारितोषिक असलेल्या साऊथ गोवा क्रिकेट स्पर्धेत समालोचन केले आहे.त्यांची समालोचक संघटनेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.