कणकवलीतील अपघातग्रस्तांना जिल्हा रुग्णालयात हलविले..!

कणकवली : कणकवली वागदे येथे दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातातील परिस्थिती ही अतिशय गंभीर असून अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. याच आरोग्य यंत्रणेची मोठी धावपळ देखील उडालेली पाहायला मिळते. तसेच अनेक अपघातग्रस्तांना मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या असून, काहींना अत्यंत जिवाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन माघारी परताव लागलेल आहे, अशातच नेमकी ही परिस्थिती कशी उद्भवली याबाबत मात्र उलट सुलट चर्च सुरू आहेत. मात्र, वेळीच प्रसंगावधान राखत त्या ठिकाणी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आलेले वागदे सरपंच संदीप सावंत, तसेच शहराध्यक्ष अण्णा कोदे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, यांच्यासह अनेकजणानी अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीची मदत देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.