एनएचएममधील आरोग्य सेवक-सेविकांना कमी केले जाणार नाही | मंत्री नारायण राणे यांचे आश्वासन

कुडाळ : एनएचएम मधील कार्यरत असलेल्या आणि आता सेवेतून कमी केलेल्या एकही आरोग्य सेवक – सेविका कर्मचाऱ्यांस कमी केले जाणार नाही. जेथे आहेत त्याच ठिकाणी पुन्हा हजर करून घेणार असल्याचा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एनएचएम मधील कार्यरत १९ आरोग्य सेविका यांना ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सेवेतून कमी करण्यात आले असून तीन महिने उलटून ही न्याय मिळत नसल्याने काल केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबई येथे या कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा nhm संघटना अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, स्वाती भोगते, नीलम कदम, अंकिता तेली, अदिती चव्हाण, प्रियांका गावडे, सायली जाधव,या आरोग्य सेविकांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबई येथे भेट घेतली. आणि आपल्या व्यथा मांडल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ आरोग्य सेविका तर राज्यात ५९७ आरोग्य सेविकांना कमी केल्याने यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यांनी आरोग्य विभागात १० ते १२ वर्षे आरोग्य सेवा दिलेली असून कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जात आरोग्य सेवा दिलेली आहे.

यावेळी केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, यांना फोनवरून संपर्क करून केंद्र सरकारकडे लवकरच सदर पदाच्या मंजुरी करिता प्रस्ताव सादर करणेच्या सूचना दिलेल्या. तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडावीया यांचेशी चर्चा करून एकही कर्मचाऱ्यांस कमी केले जाणार नाही. आहे त्याच ठिकाणी पुन्हा हजर करून घेणार असल्याचे सांगितले आश्वासन दिले. एकही अनुभवी आरोग्य सेविकांवर अन्यथा होऊ देणार नाही. याबाबत केंद्रीय एनएचएम आरोग्य विभागाच्या सचिवांशी फोन वरून चर्चा केली. दिल्ली मंत्रालयात गेल्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त केले आहे.