कणकवली : भाजपचे आ.नितेश राणे यांच्यावतीने गरजू शाळकरी मुलींना मोफत वाटप केल्या जाणाऱ्या सायकलचा दुसरा टप्पा १ मे रोजी वितरित केला जाणार आहे. यात १०० मुलींना मोफत सायकलचे वाटप केले जाणार आहे यापूर्वी पहिल्या टप्प्यातील सायकल वाटप केलेल्या आहेत. याचा दुसऱ्या टप्प्यातील सायकल वितरणाचा फायदा कणकवली ,देवगड, वैभववाडी येथील गरजू विद्यार्थिनींनी घ्यावा असे आवाहन आ.नितेश राणे यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मतदारसंघातील १०० शालेय विद्यार्थ्यांनींना सायकलचे वाटप कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. यापूर्वी १० एप्रिल रोजी केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहील्या टप्प्यातील गरजवंत ११० विद्यार्थ्यांनीना सायकलचे वाटप करण्यात आले होते. यापुढे अशाच पद्धतीने टप्याटप्प्याने मतदारसंघातील विद्यार्थीनीना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.असे कळविण्यात आले आहे.





