देवगड : 17 एप्रिल रोजी विठला देवी फणसगाव येथे जगन्नाथ विष्णू नारकर व दीपक महादेव नारकर यांच्या कुटुंबांमध्ये सामायिक जमिनीच्या भांडणातून वाद झाले व या वादातून दीपक नारकर व त्यांच्या कुटुंबांना हाणामारी करून जगन्नाथ विष्णू नारकर यांना गंभीर येत्या दुखापत केले व ठार मारण्याचे उद्देशाने हा हल्ला केला अशी फिर्याद जगन्नाथ यांच्या मुलगा राजेश नारकर यांनी विजयदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये दिली होती या फिर्यादीनुसार दीपक महादेव नारकर योगिता दीपक नारकर ऋषिकेश दीपक नारकर शैलेश दीपक नारकर व दीपक विष्णू पाटणकर व विष्णू तुकाराम पाटणकर अशा सात जणांवर भादवि कलम 307 143 147 148 149 354-ब 324 124-ब 504 506 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 135 अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला व या गुन्ह्याकामी 24 एप्रिल 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व सात आरोपींना प्रत्येकी रुपये 15000 च्या अटकपूर्व जामिनावर मुक्तता केली या कामे आरोपिंच्या वतीने अँड सिद्धेश अविनाश माणगावकर यांनी यशस्वी व्यक्तिवाद साधला.
Home ब्रेकिंग न्यूज विठ्ठलादेवी फणसगाव येथील सामायिक जमीन वादातील संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर..





