मुंबई – गोवा महामार्गवर ओसरगाव- कसाल ब्रीजनजीक सर्कलची मागणी…!

सिंधुदुर्गनगरी : मुंबई – गोवा महामार्गवर ओसरगाव- कसाल ब्रीजनजीक ओवळीये फाटा येथे सर्कल व्हावे, अशी मागणी सरपंच सुप्रिया कदम यांच्यासह तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्ष प्रदीप तळेकर यांनी केली आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत असताना ओसरगाव ग्रामस्थांनी कसाल ब्रीजनजीक ओवळीये फाटा येथे सर्कल ठेवण्याची मागणी केली होती. मात्र महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मागणीची दखल न घेतल्याने ओसरगाव, ओवळीये, मालवणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

याकडे स्थानिक लोकप्रतिनिधिंनी लक्ष वेधून कायमस्वरूपी ठोस निर्णय द्यावा, अन्यथा उपोषण करण्याचा पवित्रा सुप्रिया कदम व प्रदीप तळेकर यांनी दिला आहे. उपसरपंच गुरूदास सावंत, ओवळीये पोलिस पाटील मारुती जंगम, आबा खांदारे, रमेश परब, विजय सावंत आदी उपस्थित होते.

आंगणेवाडी जत्रेला जाणारे भाविका ओसरगाव, ओवळीये फाटा येथून जातात. ही जत्रा काही दिवसांवर आली असून, जत्रा कालावधीत कसाल- ओवळीये फाट्यावर अपघात रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.