विजयदुर्ग : विजयदुर्ग समुद्रात हजारोंच्या संख्येने शेळ्यांची वाहतूक करणारे आखाती देशात जाणारे संशयास्पद जहाज सापडल्याने खळबळ उडाली. मात्र पोलीस यंत्रणेने या जहाजवर संशयास्पद काहीही आढळले नसल्याचे व सर्व परवा परवानगी घेऊनच हे जहाज विजयदुर्ग बंदरात आले होते हे जहाज गुरुवारी सकाळी शेळ्या घेऊन गुजरात येथे रवाना झाल्याचे सांगितले.विजयदुर्ग किल्लासमोर समुद्रात मंगळवारी एक संशयस्पद जहाज दिसले. हाजी अली हे जहाज हजारोंच्या संख्येने शेळ्यांची वाहतूक करून इराणमध्ये घेऊन जात असून या नौकेवर पाकिस्तानी नागरिक असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.मात्र पोलीस यंत्रणेनेही अफवा असल्याचे सांगितले. पोलीस, बंदर कस्टम विभागाने याबाबत माहिती घेतली हे जहाज बुधवारी सायंकाळी विजयदुर्ग येथे लावण्यात आले होते. या जहाजेच्या तपासणी केली असता संशयास्पद काही आढळलेले नाही. परवानगी घेऊन हे जहाज आलेले होते.गुरुवारी सकाळी शेळ्या घेऊन हे जहाज गुजरात येथे रवाना झाल्याचे पोलीस विभागाने सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.





