धक्कादायक..! भरधाव डंपरची धडक बसून ओरोस न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या सुषमा नेमण यांचा मृत्यू.!

481

सावंतवाडी : वेंगुर्ला पेंडूर येथील ओरोस मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असणाऱ्या सुषमा गणपत नेमन (वय ५०) या महिलेचा अपघातात मृत्यू झाला. ओरोस येथून कामावरून घरी येत असताना झाराप झिरो पॉईंट येथे गाडीने उतरून रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या डंपर ने धडक दिली.

या धडकेत नेमन ह्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. यावेळी काही जागरूक नागरिकांनी १०८ शी संपर्क साधून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी व पती असा परिवार आहे. सुषमा नेमन यांच्या अपघाती मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांमधून तसेच सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.