मठ – बेळगाव मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…!

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील मठ – बेळगाव मार्गाला जोडणारा रस्ता (ग्रा. मा.७१ किमी ०/८००) यां मार्गावर पुलाचे बांधकाम कामासाठी ७३ लाख १६ हजार ९५० रु निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला. यां कामाचा शुभारंभ माजी आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस,बाळू देसाई, सुहास गवंडळकर, मठ सरपंच रुपाली नाईक, उपसरपंच बंटी गावडे, अजित नाईक, रवी खानोलकर, महेश धुरी, स्वप्नील धुरी, संजय बागायतकर, विजय बोवलेकर, प्रसाद मठकर,उमेश धुरी, नंदू ठाकूर, मिलिंद मराठे, चंद्रकांत ठाकूर, अरुण ठाकूर आणि तेथील ग्रामस्थ उपस्थित होते.