कणकवली बौद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.!

122

कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा – कणकवली वतीने बौद्ध विहार कणकवली येथे महामानवाच्या प्रतिमेस वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन कणकवली नगरपंचायतचे बांधकाम सभापती नगरसेवक ॲड. विराज भोसले, जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तालुका सचिव अविनाश चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व उपस्थित सर्वानी महामानवास अभिवादन केले.

यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सत्यविजय जाधव, शंकर चव्हाण, माजी सचिव आनंद जाधव, यशवंत भोसले, प्रभाकर चव्हाण, अशोक नारकर, प्रविण म्हापणकर, चंद्रकांत पवार,अविनाश चव्हाण, देवराज जाधव, प्रथमेश जाधव आदी समाजबांधव उपस्थित होते. .