जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, गारा पडण्याची, विजा चमकण्याची व 45 ते 55 किमी प्रती तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे.

दिनांक 14 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची व गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.