असे घडवा वैद्यकीय, इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअर..! – प्राध्यापक राजाराम परब यांचा मूलमंत्र

99

सावंतवाडी : एमबीबीएस डॉक्टर होण्यासाठी आई-बाबा प्रचंड श्रीमंत पाहिजेत, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारी प्रवेश परीक्षा अर्थात नीट देण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम नाही, तर बौद्धिक बाजू आणि परीक्षेची योग्य व भरभक्कम तयारी करायला हवी, असा मूलमंत्र शालेय विद्यार्थ्यांना परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांनी बांदा येथे दिला.
डॉक्टर शंकर मोडक प्रतिष्ठान बांदा – मुंबई – नाशिक यांच्या वतीने, स्व. भारती सदाशिव वाळके यांच्या स्मरणार्थ सदाशिव सखाराम वाळके यांच्यातर्फे आयोजित ‘व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात’ प्राध्यापक राजाराम परब बोलत होते.