बांदा भाजप मंडल विस्तार, संयोजकपदी अशोक सावंत यांची निवड…!

बांदा : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा राजनजी तेली यांनी सावंतवाडी तालुका बांदा भाजप मंडल प्रभाती विस्तार मंडल अध्यक्ष म्हणून श्री. अशोक आप्पा सावंत (इन्सुली ) यांची निवड सावंतवाडी येथे जाहिर केली आहे.

यावेळी जिल्हा प्रवक्ते संजू परब जिल्हा बँक संचालक महेश सारंग बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, मनोज नाईक, मधुकर देसाई, प्रदेश सचिव मंदार कल्याणकर, एकनाथ नाडकर्णी आदी उपस्थित होते.