कुडाळ : सध्या कुडाळ मालवण मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरूच आहे असे असताना आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
कुडाळ तालुक्यातील पावशी येथे जल जीवन मिशनच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोन्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही वादाची ठिणगी उडाली. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही एक राजकीय राड्याची पुन्हा झलकच असल्याचे सर्वत्र म्हटले जातेय. कणकवली मागोमाग आता कुडाळत देखील राजकीय राड्याची ठिणगी उडालेली पाहायला मिळते.





