आम आदमी पार्टी झाडू चिन्हासह राष्ट्रीय पक्ष- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांबाबत आज निर्णय जाहीर केलेत . यामध्ये शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून तो महाराष्ट्रात स्थानिक पक्ष म्हणून गणला जाईल असे नमूद केले आहे . तर आम आदमी पार्टी आता त्यांच्या झाडू चिन्हासह राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जाणारा आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्ष सुदधा आता केवळ तीन केरळ , मणिपूर आणि तामिळनाडू राज्यांपुरता मर्यादित पक्ष म्हणून राहणार आहे .





