मंत्री नारायण राणेंच्या वाढदिनी शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप..!

कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या गरजू शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी करण्यात आला. शुभारंभाला ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.

आमदार नितेश राणे यांच्या या उपक्रमाचा कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील शाळकरी गरजू मुलींना लाभ होणार आहे. त्याची सुरुवात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३८० सायकल मतदार संघात दिल्या जाणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलींसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ११० शाळकरी मुलींना सायकल वाटप करणार आल्या.

यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत सौ. नीलम राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, समीर नलावडे, संजना सावंत, मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, हर्षदा वाळके, प्रज्ञा ढवण, डॉ. अमोल तेली, संदीप मेस्त्री यांच्या सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.