तुम्ही डोळ्यांच्या आजारांनी त्रस्त आहात | मग ‘हि’ बातमी वाचाच | कमी खर्चात दर्जेदार उपचार | विश्वसनीय ‘विवेकानंद नेत्रालय’

92

कणकवली : अलीकडेच जस जसे तंत्रज्ञान आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे, तसतसे वेगवेगळे आजार डोकी वर करू लागले आहेत. यात अलीकडे मोबाईल, संगणक, लॅपटॉप किंवा उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या व्यक्ती असो याना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. विशेषतः डोळ्यांचे आजार वाढू लागले आहेत.

यासाठी कणकवलीत नॅब नेत्र रुग्णालय मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर नेत्र रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर असल्याचे पाहायला मिळते. विवेकानंद नेत्रालय येथे रुग्णांना उपचार पद्धतीत विशेष सोई – सुविधा देखील उपलब्ध आहेत. तसेच येथे नेत्रपटलाचे विकार, मोतीबिंदू, काचबिंदू, कॉन्टॅक्ट लेन्सेस, तिरळेपणा, डोळ्यांचे नंबर कमी करण्याची उपचार पद्धती, डोळ्याच्या कोरडेपणाची तपासणी आणि उपचार असे विविध प्रकारचे उपचार देखील नेत्र रुग्णांवर केले जातात.

महागाईच्या दिवसांत सर्वसामान्यांना परवडेल अस हे विवेकानंद नेत्रालय..! रुग्ण सेवेत आज पर्यंत कधीच कोणत्या गोष्टीत कमी पडलेलं नाही. उपचार घेणाऱ्या रुग्णांना मधुमेह रुग्णांची प्राथमिक तपासणी मोफत, दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासाठी विशेष सवलत, विशेष म्हणजे अवघ्या ४००० हजार रुपयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आपण आपली दूर झालेली दृष्टी पुन्हा मिळवू शकता.

बदललेला पत्ता : विवेकानंद नेत्रालय, कणकवली
महाडिक कंपाउंड, श्रीधर नाईक चौक, नरडवे फाटा – जुवेकर मेडिकलच्या बाजूला मुंबई – गोवा महामार्ग
(🩺अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर) 🩺 डॉ. साकेत कुलकर्णी ( Phaco Surgeon), 🩺 डॉ. प्रवीण हंकारे ( Retina Specialist ) या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील कुशल अनुभवी टीमची सेवा..! संपर्क : ०२३६७ – २३३९३३/ ९८५०८४९३१५