सावंतवाडी : मळेवाड जकातनाका येथे लकी मेडिकल अँड जनरल स्टोअर चा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मळेवाड येथील युवक दीपक नाईक व त्यांच्या पत्नी दीक्षा नाईक यांनी मळेवाड जकातनाका येथे सुरू केलेल्या लकी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या नवीन औषध व्यवसायाच्या दुकानाचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे सरपंच सौ. मिलन पार्सेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर डॉ.गणपत टोपले व डॉ. नमिता धुरी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.
या शुभाप्रसंगी उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना नाईक दांपत्यांनी सुरू केलेल्या नवीन औषध व्यवसायाला शुभेच्छा देत व्यवसाय करत असताना वेळोवेळी लागणारी मदतही करण्याचे आश्वासन दिले.
या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,अमोल नाईक, सानिका शेवडे,महेश शिरसाट,मेडिकल स्टोअर्सचे मालक दीपक नाईक,दीक्षा नाईक,रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष गुरुप्रसाद नाईक,मुळेवाड विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश पार्सेकर,निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सगुण नाईक,व्यापारी संघाचे पदाधिकारी रमाकांत नाईक,संतोष मराठे,श्रीकांत नाईक,मनोज सातार्डेकर,बाळा शिरसाट आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू नाईक यांनी केले.





