सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उद्योजक घडविण्यासाठी आ. नितेश राणेंची मोठी घोषणा | पहाच…

95

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उद्योजक घडविण्यासाठी मोठी घोषणा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कोकण भूमी टीबीआय फाउंडेशन या कोकणातील पहिल्या इंक्युबेशन सेंटर चे उदघाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज येथे संस्थाध्यक्ष नीलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.हे इनक्युबेशन सेंटर भारत सरकार मान्यताप्राप्त असून एम एस एम इ च्या विभागांतर्गत होस्ट इनक्युबेशन म्हणून नोंदनिकृत आहे.नवीन बिजनेस साठी लागणाऱ्या सर्व सुविधा या सेंटरमध्ये असणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यासह कोकणातील सर्व नवीन उद्योजकानी घ्यावा असे आवाहन आमदार नितेश राणेंनी केले. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा सर्व प्रकारचा बॅक अप या सेंटरमध्ये असणार आहे. एस एस पी एम इंजीनियरिंग कॉलेजमध्ये त्यासाठी स्वतंत्र इमारतीत ही व्यवस्था करण्यात आली आहे. आधुनिक युगात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इनोव्हेशन इंक्युबॅशन आणि स्टार्टअप जगभर राबविले जाते त्यातूनच नवीन पॅटर्न आणि उद्योग उभे राहतात भारतात नावीन्यपूर्ण संशोधनाचे बीज यातूनच रोवले जाते. कोकणातील बेरोजगारांना या सेंटरच्या माध्यमातून सर्व योजनांची माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे आर्थिक सहाय्य उद्योग उभा करण्यासाठी कसे मिळवावे याचे मार्गदर्शन ही केले जाणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.