देवगड : १४ विद्या ६४ कला असे म्हटले जाते या १४ विद्या म्हणजे ज्ञानाच्या शाखा या ज्ञानाच्या शाखा परिश्रमाने शिकता येतात. पण ६४ कला या अनुवंशिकतेतून आपल्याला मिळाव्यावा लागतात. कारण कला रक्तात असावी तरच कलावंत जन्माला येऊन ज्ञानी होऊ शकतो. सोमण कुटुंबीयांना मिळालेले दान हे अनुवंशिक असल्यामुळे हे सोमण कुटुंब कलेचे भांडार आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम ओगले यांनी केले.

मिठबाव ब्राह्मण सभा आयोजित जेष्ठ साहित्यिक नंदकुमार सोमण लिखित वास्तुस्पर्श या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
मिठबाव भटवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक ज्येष्ठ साहित्यिक चित्रकार नंदकुमार सोमण यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथासंग्रहाच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम सोहळा मिठबाव येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मालवण येथील प्रथितयश डॉ अविनाश झाट्ये, डॉ सौ शिल्पा झाट्ये, नंदकुमार सोमण, सौ शोभा सोमण, देवदुर्ग परिवाराचे आनंद लोके,प्रा अविनाश बापट, मिठबाव ब्राह्मण महासभेचे उपाध्यक्ष महादेव खाडीलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ओगले पुढे म्हणाले, वास्तु स्पर्श या पुस्तकात सोमणसर यांनी लिहिलेल्या कथा या काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. या गोष्टी कुठे ना कुठेतरी घडून गेलेल्या आहेत. फक्त कथेतील नाव तेवढी बदललेली आहेत.एखाद्या शब्दाचे चित्र रेखाटल्याप्रमाणे या पुस्तकातील कथा जिवंत असतात. त्याचं कथा लोकांच्या मनाला भिडतात अशा पद्धतीची मांडणी या कथासंग्रहात सोमणसर यांनी केली असल्याचेही ओगले यांनी सांगितले. वास्तुस्पर्श कथेतील कथा या काल्पनिक गोष्टी नसून या सर्व रिअल टाईम गोष्टी आहेत. सोमणसरांसारखे शिक्षक भावी पिढीला दिशादर्शक आहेत. वास्तु स्पर्श हे पुस्तक कथासंग्रह नसून हे त्यांचे आयुष्य आहे. त्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या सर्व गोष्टींचे सुंदर वर्णन या कथासंग्रहातून केले असल्याचे मत डॉ झाट्ये यांनी व्यक्त केले. तर यावेळी साहित्यिक सोमण म्हणाले माझा शिष्य व देवदुर्ग परिवाराचे मालक आनंद लोके यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच वास्तुस्पर्श कथासंग्रहाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकातून मला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था मिळाली आहे त्यामुळे मी आता थांबणार नाही लवकरच माझ्या काव्यसंग्रह व व्यक्तिचित्र संग्रहाचे प्रकाशन देखील केले जाणार असल्याचेही साहित्यिक सोमण यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित माजी विद्यार्थी यांनी आपली मनोगते व्यक्त केली ८१ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण सभा मिठबावच्या वतीने श्री व सौ सोमण यांचे सर्व सुहासिनींनी त्यांचे औक्षण केले. ब्राह्मण सभा मंडळ मिठबाव यांच्यावतीने व्यासपट्टा व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा आला.तसेच मिठबाव ब्राम्हणसभा, देवगड ब्राह्मण सभा मंडळ , रामेश्वर जीर्णोद्धार समिती, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी यांच्यावतीने सोमणसर यांचा सत्कार करण्यात आला तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.





