सावंतवाडी : सुकळवाड येथील आरोपी प्रदीप मारुती पाताडे याची जिल्हा व सत्र न्यायधिश साहेब यांनी रक्कम रुपये पंधरा हजारच्या जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध ३७६,३७६(२)(N),३५४,३५४(D),५०६ अन्वये गुन्हा दाखल केरून आरोपी याला दि.२७/०२/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली होती. याकामी ॲड. अनिल निरवडेकर यांनी आरोपी याला जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालय ओरोस येथे जामीन अर्ज दाखल केलेला होता.. त्याकामी जिल्हा न्यायालयाने ॲड. निरवडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर आरोपी यास जामीन मंजुर केला आहे.. याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर,ॲड. गणेश चव्हाण,ॲड. अशोक जाधव, चैतन्य सावंत,ॲड. सत्यवान चेंडवणकर यांनी काम पाहिले.





